
नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळाप्रकरणी राजदचे प्रमुख आणि माजी पेंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईडीला मंजुरी दिली आहे.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री, त्यांचे पुत्र आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव व कुटुंबातील इतर सदस्यांवर मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) आरोपपत्र दाखल केले होते.
2004-2009 दरम्यान तत्कालीन पेंद्रीय रेल्वेमंत्री असलेल्या लालूप्रसाद यादव यांनी भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी पर्यायी कर्मचाऱयांच्या नियुक्तीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. सीबीआयच्या एफआयआरवरून हा खटला सुरू झाला आहे. रेल्वेमध्ये नोकरीच्या बदल्यात उमेदवारांकडून लाच म्हणून जमीन घेण्यात आली होती. या जमिनी थेट किंवा अप्रत्यक्षपणे लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदवण्यात आल्याचा आरोप आहे.