उत्तर प्रदेशमध्ये घुसले लश्करचे दोन दहशतवादी, शोध मोहीम सुरू

452

लश्कर ए तोयबाचे दोन दहशतवादी उत्तर प्रदेशमध्य घुसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील गोरखपुरमध्ये हाय ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच हे दोन दहशतवादी उत्तर प्रदेशमध्ये नेपाळमध्ये पळण्याच्या मार्गावर आहेत. अयोध्येतून येणारी प्रत्येक गाडी तपासली जात आहे, तसेच रामनगर भागात सुरक्षा वाढवण्यात आली असून हाय ऍलर्ट जारी करण्यात आले आहे.

ख्वाजा मोईनद्दीन आनि अब्दुल समद अशी या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत. दोघे दहशतवादी दक्षिण हिंदुस्थानमधून आले आहेत. दोघांनी इसिसकडून प्रक्षिशण घेतले असून ते हिंदुस्थानात परतले होते. तसेच तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना लश्कर ए तोयबाकडे वळवण्याची कामगिरी दोघांकडे होती.

दोघेही उत्तर प्रदेशमध्ये पोहोचले असून हिंदुस्थान-नेपाळ सीमेवरून ते नेपाळमध्ये पलायन करण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी गोरखपुर जिल्ह्यात हाय ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. दोघांना शेवटी पश्चिम बंगलाच्या सिलीगुडीमध्ये पाहण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या