
गेल्या पाच महिन्यात रेल्वे अपघातात 922 जणांचा मृत्यू झाला आहे. इतकंच नाही तर लोकलमधून पडून या पाच महिन्यात 210 जणांचा मृत्यू झाला आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.
प्रवाशांच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते आणि प्रवाशांनी लोकलमध्ये वाढत जाणाऱ्या गर्दीबाबात चिंता व्यक्त केली आहे. तसेच लोकलच्या अपूऱ्या फेऱ्या, फलाटांवर असलेला सुरक्षेचा अभाव यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. अजय बोस यांनी याबाबत माहिती अधिकारातून ही माहिती मागवली होती. ही फक्त आकडेवारी नाही तर प्रवाशांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याचे सांगितले. दरोर एका निष्पाप प्रवाशाचा बळी जात असल्याचेही त्यांनी म्हटले.
712 अपघाती मृत्यू विविध कारणांमुळे झाले, त्यामध्ये रेल्वे रुळ ओलांडणे हे प्रमुख कारण होते. मुंबईची उपनगरी रेल्वे सेवा दररोज पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गांवर मिळून 70 लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करते.