सोप्या पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत राज्यपाल सकारात्मक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या संदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सोप्या पद्धतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत राज्यपाल सकारात्मक असल्याचे या भेटीनंतर उदय सामंत यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी राज्यपाल व उच व तंत्रशिक्षण मंत्र्यांची पुन्हा एक बैठक होणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या संदर्भात यावेळी चर्चा झाली यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, उच्च शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटाही यावेळी उपस्थित होते.