भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन, हृदयनाथ मंगेशकर यांनी दिला मुखाग्नी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर रविवारी शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांनी मुखान्गी दिला आहे. गानकोकिळा आता पंचत्वात विलीन झाल्या आहेत. हिंदुस्थानी संगीत विश्वातला एक अढळ ध्रुवतारा, हिंदुस्थानच्या स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन रविवारी सकाळी झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. सकाळी 8.12 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लता दीदींच्या पश्चात आशा भोसले, उषा मंगेशकर आणि मीना खडीकर अशा तीन बहिणी तर हृदयनाथ मंगेशकर हे बंधू असा परिवार आहे. लतादीदींच्या निधनामुळे मंगेशकर कुटुंबीयांसह अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. लता दीदींच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.