लातूरमध्ये 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

1443
corona-virus-new-lates

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये जिल्ह्यातील २१३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी १८७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ९ जणांचे अनिर्णित राहिले, १ अहवाल रद्द करण्यात आला तर ८ अहवाल प्रलंबित राहिले आहेत.

उदगीर तालुक्यातील १ रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर एका रुग्णाचा अहवाल अनिर्णित आला आहे. औसा तालुक्यातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून तिघांचे अहवाल अनिर्णित आले आहेत. निलंगा तालुक्यातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एकाचा अहवाल अनिर्णित आला आहे. लातूर महानगरपालिकेकडून आलेल्या स्वॅबपैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दोघांचा अहवाल अनिर्णित आला आहे तर एकाचा अहवाल रद्द करण्यात आला आहे. अहमदपूर येथून आलेल्या अहवालापैकी पाच तर स्त्री रुग्णालयातून आलेल्या अहवालापैकी तीन असे आठजणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकून ६१ रुग्ण दाखल असून सद्यस्थितीत कोरोना अतिदक्षता विभागात २५ रुग्ण दाखल असून ०५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत व उर्वरीत ३६ रुग्ण कोरोना विलगीकारण कक्षात दाखल असून त्यांची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर आहे. दि. ३ जुलै रोजी ०४ रुग्णांना त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. त्यापैकी ०३ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होते एक रुग्ण १३ दिवस व्हेंटिलेटरवर होता दुसरा रुग्ण १० दिवस अतिदक्षता विभागात होता व उर्वरीत एक रुग्ण ०४ दिवस व्हेंटिलेटरवर होता व दुसरा रुग्ण ०६ दिवस व्हेंटिलेटरवर होता त्याचे डायलिसिस करण्यात आले होते. या सर्व रुग्णाची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १७०, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या २२५ व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २० आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या ४०८ इतकी आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय ढगे यांनी दिली आहे.

चार कर्नाटक राज्यात तर तीन रुग्ण धाराशिव जिल्ह्यात वर्ग केलेले आहेत. परंतु उपचार लातूर येथे सुरू आहेत. चार रुग्णांना कर्नाटक राज्याने व तीन रुग्णांना धाराशिव जिल्ह्याने पोर्टलद्वारे स्वीकारले असून त्या रुग्णांची नोंद संबंधित राज्य व जिल्ह्यामध्ये झालेली असल्याने लातूर जिल्ह्याच्या एकूण रुग्णांच्या संख्येतून ७ रुग्ण कमी करण्यात आलेले आहेत. ३ जुलै रोजी रुग्णालयातून उपचाराने बरे झालेल्या ९ रुग्णांना सुट्टी देण्यात आली तर सामान्य रुग्णालय उदगीर येथील एका महिला रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या