लातूरमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही, सर्व 59 नमुने निगेटिव्ह

1733

लातुर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 29.03.2020 रोजी सकाळी 8.00 ते दु 4.00 पर्यंत एकूण  282 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून आजपर्यंत 59 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणु संस्था, पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी सर्वच 59 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. सद्यस्थितीत  09 व्यक्तींचा  Quarantined कालावधी संपला आहे व इतर 43 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantined  मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे अशी माहिती डॉ. मारुती कराळे कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र विभाग यांनी दिली.

प्राथमिक तपासणी नंतर COVID-19 आजारा सारखी लक्षणे आढळल्यास किंवा कोरोना बाधित / संशयित व्यक्तींचा संपर्क झाला असेल तर अशा व्यक्तींना व प्रवाशांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर येथील कोरोना विलगीकरण कक्षात तपासणीसाठी पाठविण्यात यावे.  तसेच जिल्ह्यामध्ये एकही कोरोना बाधित / संशयित व्यक्ती नसला तरीही नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये व शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सर्वांचे सहकार्य राहिले तर आपण कोरोना ला लातूर मध्ये प्रवेश करू देणार नाही असे आवाहन डॉ. गिरीष ठाकुर  अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या