जिवंत कोंबडी फक्त 20 रुपयात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील हडोळती येथे मंगळवारी आठवडी बाजारामध्ये धुली-वंदनाच्या दिवशी आजुबाजूच्या परिसरातील पोल्ट्री फार्म धारकांनी टमटम, अॅपे आटोमध्ये जिवंत कोंबडी 100 रुपये दोन नग प्रमाणे विक्री करत असल्याचे चित्र पहायला मिळाले या एका कोंबडीचे वजन प्रति किलो दोन ते अडीच कीलो असल्यामुळे 20 रुपये प्रति किलो प्रमाणे चिकनचा दर आहे त्यामूळे धुलीवंदन व करी दीन असल्यामुळे मांसाहार शौकीनाची कोंबडी खरेदीसाठी एकच धांदल उडाली त्यामूळे भाजीपाल्याच्या तुलनेचा दरात चिकन स्वस्त मिळत होते.

कोरोना वायरस या आजाराच्या धसक्याने तालुक्यात व ग्रामीण भागात दहशत निर्माण झाली असली तरी चिकनमुळे हा व्हायरस शरीरात जात आहे अशी अफवा पसरली असली तरी पोल्ट्रीफॉर्म धारकांना याचा सर्वात जास्त फटका सहन करावा लागत आहे हजारो रुपये खर्च करून सुशिक्षीत बेरोजगारांनी परिसरात पोल्ट्री फॉर्म शेड उभे केले आहेत. परंतू या कोरोनाचा जबर फटका या पोल्ट्री फॉर्म धारकांना बसत आहे. गेल्या महिन्यात 120 ते 150 रु किलो प्रमाणे मिळणारे चिकन या कोरोना मुळे चक्क 20 रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे त्यामुळे भाजीपाल्यापेक्षा स्वस्त चिकनचा दर पहावयास मिळत आहे.