
लातुरात कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचार घेत असताना आज मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे.
कोरोनामुळे आज मृत्यू झालेल्या रुग्णास किडनी तसेच मधुमेहाचा त्रास होता. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 157 झालेली आहे. यामध्ये शहरी भागातील 83 रुग्णांचा तर ग्रामीण भागातील 74 रुग्णांचा समावेश आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या 24 आहे. त्यामध्ये सहा रुग्ण हे गंभीर स्वरूपातील असून त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आलेले आहे. चार रुग्ण ऑक्सिजन’वर असून 14 रुग्ण सौम्य प्रकारातील आहेत.


























































