लातूरची कोरोना रुग्णसंख्या घटली, 69351 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले

लातूर जिल्ह्यातील 69351 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 696 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 1337 आरटीपीसीआर चाचणी साठी नमुने घेण्यात आलेले आहेत. 294 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या प्रलंबित मधील 70 पॉझिटिव्ह आले आहेत. 1862 रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 332 जण पॉझिटिव्ह आढळून आले.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 81668 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 10744 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1573 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 69351 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 882 आहे.

आपली प्रतिक्रिया द्या