लातूरमध्ये रस्त्यात अडवून तिघांनी लुटले

शहरातील शाहूचौकाजवळ रात्री पायी घराकडे जाणाऱ्या व्यक्तीस थांबवून दुचाकीवरील तिघांनी लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात तिघांविरुध्द गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाखेड येथून लातूर येथे कंदुरीसाठी रात्रीच्या सुमारास आलेला उमरखॉ नियाजअली पठाण पायी चालत बौध्द नगर येथील मावशीच्या घराकडे जात असताना नांदेड रोडवरील शाहूचौकाजवळ दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी रस्त्यात थांबवून त्याच्याजवळील 8500 रुपयांचा मोबाईल आणि 3 हजार रुपये रोख रक्कम काढून घेतले. लाथाबुक्यांनी मारहाण केली. गांधीचौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या