मोटारसायकलच्या डिक्कीमधून 1 लाखांची रक्कम व कागदपत्रे पळवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूरमध्ये मोटारसायकलच्या डिक्कीमधून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख रुपये रोख आणि कागदपत्रे लंपास केल्याची घटना उदगीर शहरात घडली.

या चोरी प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात विनोद व्यंकटराव मघेवाड (रा. तिरुका ता.) जळकोट यांनी तक्रार दाखल केली. तक्रारदाराच्या मोटारसायकलच्या डिक्कीचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी डिक्कीमधील 1 लाख रुपये रोख, एसबीआय बँकेचे एटीएम, तक्रारदाराच्या मित्राचे पॅनकार्ड आणि दोन धनादेश चोरुन नेले. पोलीसांनी अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक एडके हे करीत आहेत.