
लातूर जिल्ह्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. उपचारादरम्यान ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंत तब्बल १६१५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता कमी कमी होत आहे. आज नव्याने जिल्ह्यात १४७ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आलेले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता १८६३१ वर पोहोचलेली आहे. सध्या १९३९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आज २५३ रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. जिल्ह्यातील १६१५४ रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतले आहेत. लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८६.७० टक्के आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत ५३८ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.


























































