लातूर जिल्ह्याने कोरोनाग्रस्त रुग्णांचा 300 चा टप्पा पार केला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 94, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 197 तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 16 इतकी आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 309 इतकी आहे.

शनिवारी नव्याने तब्बल 29 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नऊ रुग्णांचे अहवाल अनिर्णीत आले असून दोघांचे अहवाल रद्द करण्यात आले आहेत. उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला त्यामुळे लातूर जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 16 वर पोहोचली आहे. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये दिनांक 27 रोजी 211 रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी आलेले होते. त्या पैकी 171 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 29 पॉझिटिव्ह जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 09 जणांचे अहवाल अनिर्णित आले व दोघांचे अहवाल रद्द करण्यात आले आहेत.

विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 55 व्यक्तींचे स्वॅब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 41 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 09 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 4 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले असून एका व्यक्तीच्या स्वब परीपूर्ण न आल्यामुळे रद्द करण्यात आला आहे. महानगरपालिकेकडून 06 व्यक्तीचे स्वॅब तापसणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 06 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. स्त्री रुग्णालय लातूर येथून 26 व्यक्तींचे स्वॅब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 25 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती अंबाजोगाई रोड लातुर येथील आहे.

उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 36 व्यक्तींचे स्वॅब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 32 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 03 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल अनिर्णित पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती बनशेळकी रोड, भीम नगर, सुळ गल्ली, शिवनगर, साई नगर, झीगणप्पा गल्ली, क्वाईल नगर,लातूर येथील व्यक्तीचा समावेश आहे. एक व्यक्ती गंगापूर येथील आहे तर दुसरी व्यक्ती मिरकल ता. बस्वकल्याण जि. बिदर येथील आहे. दिनांक 27.06.2020 रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील सात रुग्णांना त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाली असल्यामुळे या रुग्णालयातून सुटी करण्यात आली. त्यापैकी तीन रुग्ण शहरातील असून चार रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तसेच यापैकी दोन रुग्णास मधुमेह हा आजार होता एका रुग्णास उच्च रक्तदाब हा आजार होता एका रुग्णाचे हृदयाचे ऑपरेशन झाले होते. त्यातील पाच रुग्णांना गंभीर स्वरूपाचा आजार होता व हे पाच रुग्ण अतिदक्षता विभागामध्ये दाखल होते. उर्वरित दोन रुग्णांना सौम्य स्वरूपाचा आजार होता हे रुग्ण 25 ते 80 वर्ष वयोगटातील असून त्यामध्ये चार पुरुष रुग्ण व तीन महिला रुग्ण यांचा समावेश आहे माहिती डॉ. किरण डावळे यांनी दिली.

पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती मध्ये महानगरपालिका क्षेत्रातील भिम नगर, सुळ गल्ली, मारुती मंदिर साई, झिंगण आप्पा गल्ली, क्वाईल नगर, अंबाजोगाई रोड येथील प्रत्येकी एक. गंगापूर येथील चार, उदगीर येथील बनशेळकी रोड, सुभाष रोड चौबारा सुधा हॉस्पिटल रावणगाव येथील प्रत्येकी एक, अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथील सात, औसा तालुक्यातील भेटा येथील सहा सारोळा येथील 2 तर बुधोडा येथील एका रुग्णांचा समावेश आहे.

लातूर जिल्ह्यात वृद्ध कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
उपचार सुरू असताना पुन्हा लातूर जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदरील मृत्यू झालेला रुग्ण हा 70 वर्षाचा होता.
अहमदपूर तालूक्यातील मौजे हाडोळती येथील एक वृध्द व्यक्ती लातूर येथे आपल्या मुलीकडे आलेले होते. त्यांना कोरोनाची लागण झालेली होती त्यामुळे त्यांच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर लातूर येथेच अंतिमसंस्कार करण्यात आले. लातूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेच्या रुग्णांची संख्या यामुळे 16 वर पोहोचली आहे.