लातूर जिल्ह्यात चोवीस तासात 66.9 मि.मी. पावसाची नोंद, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान

लातूर जिल्ह्यात दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत सरासरी 66.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत झालेला पाऊस हा जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या 109 टक्के झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात अनेक मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील सर्वत्र नदी, नाले, ओढे भरभरून वाहत आहेत. सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मागील 24 तासात झालेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे हे आजपर्यंत झालेल्या पावसाचे आहेत. लातूर 82.7 मि.मी. (692), औसा 64.4 मि.मी. (612.7), रेणापूर 63.3 मि.मी. (747.4), अहमदपूर 82.7 मि.मी. (664.9), चावूâर 72 मि.मी. (705.8), उदगीर 69.7 मि.मी. (764.5), जळकोट 75.7 मि.मी. (682.5), निलंगा 48.8 मि.मी. (654.2), देवणी 45.0 मि.मी (679.3) व शिरुर अनंतपाळ 57.9. मि.मी (729.2) पावसाची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्यात 706 मि.मी. सरासरी पाऊस झालेला आहे.

लातूर जिल्ह्यातील अनेक सर्कलमध्ये अतिवृष्टी

लातूर तालुक्यातील बाभळगाव सर्कलमध्ये 83.8 मि.मी., कासारखेडा सर्कलमध्ये 74.3 मि.मी., मुरुड सर्कलमध्ये 127.8 मि.मी., गातेगाव सर्कलमध्ये 68.3 मि.मी., तांदुळजा सर्कलमध्ये 127 मि.मी., चिंचोली सर्कलमध्ये 83 मि.मी. पाऊस झाला आहे.
औसा तालुक्यातील औसा सर्कलमध्ये 72.3 मि.मी., लामजना सर्कलमध्ये 65.5 मि.मी, मातोळा सर्कलमध्ये 66 मि.मी., भादा सर्कलमध्ये 68 मि.मी., उजनी सर्कलमध्ये 37.3 मि.मी. पाऊस झाला आहे.
अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर सर्कलमध्ये 68.8 मि.मी., खंडाळी सर्कलमध्ये 66.3 मि.मी., किनगाव सर्कलमध्ये 98 मि.मी., अंधोरी सर्कलमध्ये 87.5 मि.मी., शिरुर ताजबंद सर्कलमध्ये 90 मि.मी., हडोळती सर्कलमध्ये 85.3 मि.मी. पाऊस झाला आहे.
उदगीर तालुक्यातील उदगीर सर्कलमध्ये 87.8 मि.मी., वाढवणा सर्कलमध्ये 98.3 मि.मी., हेर सर्कलमध्ये 67.8 मि.मी., तोंडार सर्कलमध्ये 101 मि.मी. पाऊस झाला आहे.
चाकूर तालुक्यातील चाकूर सर्कलमध्ये 103.3 मि.मी., शेळगाव सर्कलमध्ये 94.5 मि.मी. पाऊस झाला आहे.
रेणापूर तालुक्यातील रेणापूर सर्कलमध्ये 78.5 मि.मी., पोहरेगाव सर्कमध्ये 95.3 मि.मी., पळसी सर्कलमध्ये 101.3 मि.मी. पाऊस झाला आहे.
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ सर्कलमध्ये 65.5 मि.मी. पाऊस झाला आहे. जळकोट तालुक्यातील जळकोट सर्कलमध्ये 73.8 मि.मी. आणि घोणसी सर्कलमध्ये 77.5 मि.मी. पाऊस नोंदला गेला आहे.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झालेली होती तर काही ठिकाणी रस्त्यावरील पूल वाहून गेले आहेत. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेले सोयाबीनला पुन्हा अंकुर फुटत असल्याचे दिसत आहे. घनसरगाव येथे पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली.

अंबुलगा बु. येथे नुकसानीची पाहणी

अंबुलगा – निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु. येथे तलाठी ज्ञानेश्वर जाधव, ग्रामसेवक दीपक कांबळे, कृषी सहाय्यक नितीन वाघमारे यांनी परिसरातील नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकात पाणी साचून सोयाबीन कुजून गेले आहे. तसेच उभ्या सोयाबीनला अंकुर फुटत असल्याचे व सोयाबीन काळे पडल्याचे दिसून आले. यावेळी शेतकरी माधव पाटील, किशन शिंदे, भागवत सूर्यवंशी, विलास शिंदे, दयानंद सूर्यवंशी, संदीप पाटील, वामन शिंदे, सदानंद शिंदे, आशिष पाटील, महावीर काकडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या