
लातूर जिल्ह्यात गेल्या महिनाभरापूर्वी झालेल्या पावसाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तरी किल्लारी पासून जवळच असलेल्या लामजना ते तपसे चिंचोली जाणाऱ्या रस्त्यावर ठीकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत.
लामजना ते चिंचोली रस्त्यालगत शेतकरी संजय शिंदे यांच्या शेताजवळच असलेल्या पुलाची उंची कमी असल्यामुळे या पुलावरून कायम पाणी वाहत असल्याने पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवरून वाहने चालवताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
लामजना गावातून येणारे पाणी संजय शिंदे यांच्या शेताच्या पुलाजवळ पाणी मोठ्या प्रमाणात साचत असून ,तेथून गाडया चालवणे नागरिकांना शक्य होत नाही. त्या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीच व्यवस्था करण्यात आली नाही.
या ठिकाणी मोठ्या सिमेंट मोऱ्या टाकून पुलाची दुरुस्ती करून पाण्याला सुरळीत वाट करून रस्त्यावर पाणी येणार नाही अशी उपाययोजना करून रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी प्रवासी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
ऊसाचे मोठे ट्रक जाण्याने रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे.जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी वाहनधारकांना या खड्डय़ांमुळे चिखल, माती आणि घाणेरडे पाणी अंगावर झेलावे लागत असून लहान सहान अपघात नित्याची बाब झाली आहे. लामजना ते जुना लामजना गाव या रस्त्यांची अवस्था तर फारच वाईट आहे.
लामजना ते तपसे चिंचोली हा रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाताना आजपर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. सद्यस्थितीतही ही परिस्थिती तशीच असल्याने या रस्त्याची बिकट अवस्था आणि ठिकठिकाणी पडलेल्या मोठं मोठे खड्डे हे अपघाताला निमंत्रण देत आहेत.
या रस्त्यावरून जाणारे वाहनचालक, प्रवासी अक्षरशा त्रस्त झाले आहे. लामजना ते तपसे चिंचोली या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारक आणि प्रवाशीवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी व संबंधित बांधकाम खात्याने लक्ष द्यावे व रस्ता लवकर करून घ्यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे





























































