लातूर जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी मंगळवारी रात्रीपासून जिल्ह्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 5 या कालावधीत संचारबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.

लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात दोन दिवस स्वयंघोषित संचारबंदी पाळण्यात आली होती. परंतु रुग्ण संख्या वाढतच आहे. जिल्ह्यातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजनितीक व अन्य कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्या मध्ये मोठी गर्दी होत आहे. लग्न समारंभात ही अधिक गर्दी होत आहे.

वातावरणात झालेल्या बदलामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सध्या सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशी कोरोना सदृश लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी आज पासून महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 5 या कालावधीत संचारबंदी लागू केली आहे.