लातूरात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औसा तालुक्यातील सारणी भाग 2 येथील शेतकरी भागवत महादेव हवालदार यांनी 24 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सतत होणारी नापिकी, त्यातच याही वर्षी पावसामुळे सोयाबीन हातचे गेले. पत्नीच्या आजारपणाचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, मुलीच्या लग्नाचा खर्च अशा समस्यांनी त्यांना ग्रासले होते. सततच्या नैराश्येतून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी दैनिक सामनाशी बोलताना सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलीस घटनास्थळी हजर झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी मातोळा आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला असून पुढील तपास किल्लारी पोलीस करीत आहेत.