सोयाबीनवर करपा रोग, शेतकरी दुहेरी संकटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। येरोळ

शिरूरअनंतपाळ तालुक्यात पावसाने महिनाभर दिर्घ विश्रांती घेतल्याने हजारो हेक्टरवरील खरीप पिकांवर करपा रोग पडला आहे. सोयाबीन पिकावर करपा रोग पडल्याने दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या शेंगा सुकू लागल्या आहेत. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

संपूर्ण शिरूरअनंतपाळ तालुक्यावर जून महिन्यात पडलेल्या पावसावर शेतकर्‍यांनी खरिपाची पेरणी केली . पिकही जोमदार आले. यामुळे शेतकरी सुखावला. पण त्यानंतर पावसाने महिनाभर विश्रांती घेतल्याने पिकाला याचा मोठा फटका बसला . मूग , उडीदाचे पिकंही करपून गेली . तर सोयाबीन पिकावर रोगांचा प्रार्दुभाव झाला आहे . चक्री भुंगा , खोडमाशी . उंट अळी तर करपा रोग पडल्याने सोयाबीन पिकांना धोका निर्माण झाला आहे .

जून महीन्याच्या प्रारंभीच चांगला पाऊस पडल्याने नगदी पैशाचे पिक म्हणून कमी कालावधीत येणारे सोयाबीनच्या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली . सोयाबीनची वाढही चांगली झाली आहे . सोयाबीनला शेंगा येण्याच्या अवस्थेत असतांना पावसाने तब्बल महीनाभर ओढ दिली . यातच सोयाबीनवर उंटअळी , खोडमाशी , चक्री भुंगा व आता करपा रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने लागलेल्या कोवळ्या शेंगा सुकत आहेत . यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार असल्याने शैतकरी हवालदिल झाला आहे .

येरोळ व परिसरात सोयाबीन पिकावर खोडमाशी , उंटअळी व चक्री भुंग्याचा रोग जडला. येरोळ व परिसरातील शेत शिवारामध्ये परभणी कृषी विद्यापिठाचे तज्ञ डॉक्टर संदीप देशमुख अपविभागीय कृषी अधिकारी आर . टी . मोरे मंडळ कृषी अधिकारी बी. टी.काळदाते कृषी सहाय्यक ओम अंधारे यांनी पहाणी करुन शेतकर्‍याला फवारणी करुन घेण्याची माहीती दिली .

सध्या बहुतांश: ठिकाणी सोयाबीन पिक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून यावर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या व शेंगा पोखरणा-या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तरी शेतकऱ्यांनी त्‍वरीत कीटक नाशकाची फवारणी करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यू. एन. आळसे व किटक शास्‍त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत यांनी दिला आहे. प्रती एकर ६० मिली क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ % किंवा १४० मिली इंडाक्झाकार्ब १५.८ % किंवा १८० मिली स्पाइनेटोरॅम ११.७ %, किंवा ५० मिली थायमिथोक्झाम १२.६ % + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.३ % यापैकी कोणत्‍याही एका किटक नाशकाची फवारणी करावी. हे किटक नाशकाचे प्रमाण फवारणी प्रती पंपाकरिता असुन एकूण प्रमाण प्रती एकर याप्रमाणेच वापरावे. तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या पावसामुळे सोयाबीनवर काही ठिकाणी शेंगा करपा व चारकोल रॉट दिसून येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी या रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून प्रती एकरी कार्बेन्डेझिम १२% + मॅन्कोझेब ६३% या संयुक्त बुरशीनाशकाची २०० ग्रॅम याप्रमाणे फवारणी करावी.असे आवाहन कृषी सहाय्यक ओम अंधारे यांनी दिली आहे.