5 हजारांसाठी मुलाने केला वडिलांवर चाकू हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

5 हजार रुपये मुलाने मागीतले परंतू दोन दिवसात देतो म्हटल्यानंतर मुलाने वडिलांवर चाकू हल्ला केल्याची घटना लातूर येथील रायवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी आरोपी मुलाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात अनिल व्यंकट गुडे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचे लग्न झालेले असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. परंतू फिर्यादीचे व पत्नीचे जमत नाही म्हणून त्यांची पत्नीही मागील 15 वर्षांपासून माहेरी मुलांसह राहते. त्यांचा मुलगा शिवशंकर गुडे हा अधून मधून येऊन पैसे घेऊन जात होता. 28 डिसेंबर रोजी 12 वाजण्याच्या सुमारास ते शेतात असताना त्यांचा मुलगा आला. 5 हजार रुपये हवेत अशी मागणी त्याने केली. परंतू आता माझ्याजवळ पैसे नाहीत, दोन दिवसांनी देतो असं सांगून घरी चल असे म्हटले. त्य्यावेळी पुढे चालत असताना पाठीमागून अचानक शिवशंकर गुडे यांने त्यांच्या पाठीत चाकू हल्ला करून पळून गेला. आरडा ओरडा केल्यानंतर फिर्यादीचे वडील, पुतण्या आणि इतरांनी त्यांच्या पाठीला पट्टी बांधून पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरुन मुलगा शिवशंकर याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.