
सामना प्रतिनिधी । हिंगोली
जिल्हाधिकारी कार्यालयात एका इसमाला ५५ रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. जमिनीबाबतची शासकीय कामे करून देतो असे सांगून तो नागरिकांकडून पैसे उकळायचा. असे चौकशीत समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. मधुकर बनकर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
मधुकर जिंतूर तालुक्यातील येलदरी कॅम्प येथील रहिवासी आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील कारवाई सुरू आहे. मधुकरचे सरकारी कर्मचाऱ्याशी लागेबांधे आहेत का याचा तपास करण्यात येत आहे.

































































