तरुणाच्या हत्येप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी । लातूर

बाभळगाव शिरसी येथे तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाची हत्या केल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी आकाशचे वडील बालाजी ज्ञानोबा जाधव यांनी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात 13 एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. आदल्या दिवशी 12 एप्रील रोजी फिर्यादीचा मुलगा आकाश जाधव हा रात्री 8 वाजता बाभळगाव येथील प्रथमेश हॉटेल येथे दूध आणण्यासाठी मोटारसायकलवरुन गेला होता. पण रात्री उशीरापर्यंत तो परतला नाही. तसेच तो मोबाईलही उचलत नव्हता. यामुळे म्हणून फिर्यादी बालाजी व त्यांचा दुसरा मुलगा विकास हे लुनावरुन शिरसी येथून बाभळगावकडे निघाले. त्याचवेळी थडकर यांच्या शेताजवळ आकाशची मोटारसायकल पडलेली त्यांना दिसली. लुनाच्या आणि मोबाईलच्या लाईटमध्ये पाहिले असता रस्त्याच्या पश्चिम बाजूला त्यांना आकाश पडलेला दिसला. तो हालचाल करीत नसल्याने त्याच्या जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या छातील तिक्ष्ण हत्याराचा वार केलेला दिसून आला. तो मयत झाल्याचे लक्षात येताच बालाजी यांनी नातेवाईकांना वबाभळगाव येथील पोलीस पाटील यांना कळवले.