अल्पवयीन मुलीस घरातून जबरदस्तीने पळवून नेले, गुन्हा दाखल

709

शहरातील सितारामनगर भागातून अल्पवयीन मुलीस तिच्या घरात घुसून आईला जिवे मारण्याची धमकी देऊन पळवून नेल्यात आले. या प्रकरणी एका विरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सदर प्रकरणी नेहा नागेश सनगले सिताराम नगर लातूर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 9 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता त्यांच्या घरी आकाश उर्फ अक्षय पंडीत जाधव हा आला. मुलगी कुठे आहे, तिला माझ्यासोबत पाठवा, नाही तर तुम्हाला मारुन टाकीन अशी धमकी दिली. फिर्यादीस ढकलून दिले आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेले. त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतू तो सापडला नाही. या प्रकरणी पोलीसांनी आकाश उर्फ अक्षय पंडीत जाधव याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या