लातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

उदगीर शहरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. शेख नबाब शेख सत्तार असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख नबाब शेख सत्तार या व्यक्तीने सदर पिडीत मुलगी खेळत असताना खाऊ देतो म्हणुन बहाना करून घराच्या बाजुच्या जागेत घेऊन जाऊन पिडीत मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यावर बाल लैंगिग अत्याचार कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी एम.व्ही. जवळकर हे करत आहेत. या घटनेमुळे उदगीर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा नराधमाला जास्तीत जास्त शासन व्हावे असे तालुक्यातील विविध संघटनेकडून मागणी होत आहे. पीडित मुलीला शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांकडून या नराधमाला कडक शासन व्हावे अशी मागणी करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या