
चाकूर तालुक्यातील मौजे नळेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घर फोडले. रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा 1 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
सदरील चोरी प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात 24 ऑगस्ट रोजी रात्री 9.23 वाजता दिलेल्या तक्रारीत सुधाकर गुरूलिंगअप्पा देशमाने यांनी नमूद केले आहे की, घराच्या छतावरील लोखंडी चॅनल गेट काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मुलाच्या बेडरुममध्ये ठेवलेल्या पिशवीतील रोख 15,000 रुपये, त्याचप्रमाणे पाच ग्रॅमच्या चार सोन्याच्या अंगठ्या (एकूण 20 ग्रॅम) (किंमत 40,000 रुपये), 20 ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या (किंमत 80,000 रुपये), 20 ग्रॅम वजनाचे रस्सी लॉकेट (किंमत 40,000 रुपये) असा एकूण 1 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. नळेगाव येथील घरफोडीच्या एका गुन्ह्याचा तपास करून चोरट्यांना गजाआड करण्यात आले. मात्र, दुसऱ्याच दिवशी चोरट्यांनी पुन्हा नळेगाव येथे घरफोडी केली व पोलीसांसमोर आव्हान उभे केले. अज्ञात चोरट्यांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.





























































