
लातूर तालुक्यातील तांदुळजा येथील श्रेणी 1 चा पशुवैद्यकीय दवाखाना असुन या दवाखान्याला 10 गाव जोडली आहेत. संपूर्ण गावामध्ये गाय वर्गीय 2362 पशूधन असून त्यापैकी 2167 पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे.
तरी दिनांक 17 ऑक्टोबरपर्यंत गाधवड 3, मसाला 4, भोसा 5 असे एकूण 12 जनावरे लम्पी रोगाने बाधित झाली आहेत. त्यापैकी 9 जनावरे औषध उपचाराने बरे झाले असून बाकी जनावरांवर उपचार चालू आहेत, असे पशू अधिकारी रेश्मा पाटील यांनी दै. सामना शी बोलताना सांगितले.
गावा-गावामध्ये आम्ही फिरून लसीकरण केले असून लसीकरणापासून कोणाचेही पशू वंचित राहू नयेत म्हणून आम्ही दवाखान्याला जोडलेल्या प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालय व सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. आतापर्यंत कोणी पशुंना लसीकरण करून घेतले नसेल तर त्यांनी त्वरीत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी परिचारक एस. वाघचौरे, शिपाई मोरे व तालुक्यातील दवाखान्यातील डॉक्टर, परिचारक यांनी सहकार्य केले.





























































