लातूरमध्ये चोरट्यांचा उच्छाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यात चोरट्यांनी उच्छाद मांडलेला आहे. घरासमोर लावलेल्या टेम्पोमधील सुमारे 80 लिटर डिझेल आणि चक्क डिस्कसह वाहनाचे चार टायरही भामट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

या चोरी प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात संगमेश्वर धोंडीराम हरनाळे रा. घरणी ता. चाकूर यांनी तक्रार दाखल केली. फिर्यादीने आपल्या घरासमोर आयशर टेम्पो उभा केला होता. अज्ञात चोरट्यांनी त्या टेम्पोमधील सुमारे 80 लिटर डिझेल चोरले. तसेच चक्क 4 डिस्कसह टायरही चोरुन नेले. सुमारे 1 लाख रुपयांच्या साहित्याच्या चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द चाकूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी पुठेवाड हे करीत आहेत.