लातूर – दुचाकीची जीपला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने रस्त्यालगत उभ्या असलेल्या जीपला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात निलंगा-उदगीर रस्त्यावरील केदारपूर मोडजवळ झाला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास झाला.

या बाबत अधिक माहिती अशी की, अंबुलगा बु. येथील जाफर मदारसाब मुल्ला वय 22 वर्षे हा एम.एच.48 बीजी 3055 या दुचाकीवरुन अंबुलगा येथून निलंगा येथे जात होता. निलंगा-उदगीर या रस्त्यावरील केदारपूर मोडजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जीप क्रमांक एम.एच.14 सीएक्स 5538 ला पाठीमागून जोराची धडक बसली. घटनास्थळीच जाफर मुल्ला याचा मृत्यू झाला. केदारपूरचे पोलीस पाटील दयानंद सुर्यवंशी पाटील यांनी या घटनेची माहिती निलंगा पोलीस ठाण्यात कळवली. निलंगा पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे शवविच्छेदनासाठी पाठवला.