ऑपरेशन सिंदूरवर हसणे हा तर गुन्हाच, एफआयआर रद्द करण्यास कोर्टाचा नकार

सोसायटीच्या व्हाट्सएप ग्रुपवर ऑपरेशन सिंदूर बाबत हास्यास्पद ईमोजी वापरून देशविरोधी स्टेटस ठेवणाऱया महिलेला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. जीवाची बाजी लावून ऑपरेशन सिंदूर फते करणऱया जवानांच्या कर्तृत्वावर चुकीच्या भावना व्यक्त करत एकप्रकारे खिल्ली उडवणे म्हणजे प्रथमदर्शनी गुन्हाच असल्याचे स्पष्ट करत न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने महिले विरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यास नकार दिला.

याचिकाकर्त्या फराह दीबा यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रध्वजाबाबत आक्षेपार्ह  पोस्ट केली होती याशिवाय सोसायटीच्या व्हाट्सएप ग्रुपवर ऑपरेशन सिंदूर बाबत हसणारे ईमोजी वापरून खिल्ली उडवली होती.  देशाला मक्कार असेही म्हटले होते याप्रकरणी त्याच सोसायटीतील एका रहिवाशाच्या तक्रारीवरून पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी दीबा यांनी याचिका दाखल केली  आहे.