वकिलांनाही लोकल प्रवासाची मुभा; मात्र, ठराविक वेळेतच करता येणार प्रवास

मुंबईतील विविध न्यायालयात काम करणारे वकिल तसेच रजिस्टर क्लार्पना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा रेल्वेने दिली आहे. मात्र, प्रवास करताना वकिलांना वेळेचे बंधन असणार आहे.

राज्य सरकारच्या मागणीवरून मुंबईत लोकलने प्रवास करण्याची अखेर मुभा रेल्वेने दिली आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयातही वेळोवेळी सुनावणी होऊन राज्य सरकारला आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रवास करताना वकिलांना वेळेचे बंधन असणार आहे. सकाळी लोकल सुरू झाल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत, त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 4 आणि संध्याकाळी 7 नंतर शेवटची लोकल असेपर्यंत प्रवासास मुभा असणार आहे. गर्दीच्या वेळी वकिलांना प्रवास करता येणार नाही. मासिक पासही मिळणार नाही, प्रत्येक प्रवासासाठी जाताना आणि येताना वेगवेगळे तिकीट काढावे लागणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या अधिपृत ओळखपत्रावरच तिकीट मिळणार आहे. अधिपृत कामासाठीच प्रवास करता येणार आहे, खाजगी कामासाठी प्रवास करता येणार नाही. लोकलने प्रवास करण्याची मुभा मिळावी यासाठी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. वकील आणि त्यांच्याकडील नोंदणीपृत कारकून लोकलने प्रवास करू शकणार आहेत.

यापूर्वी बुधवार 21 ऑक्टोबर पासून सर्व महिलांना नॉन पिकअवर मध्ये लोकल प्रवासाची मुभा दिली होती. तसेच खासगी सुरक्षारक्षकांना देखील लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामुळे 22 मार्चपासून रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर 15 जून पासून टप्प्या टप्प्याने अत्यावश्यक कर्मचारी वर्गासाठी लोकल ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. सध्या मध्य रेल्वे 706 तर पश्चिम रेल्वे 704 लोकल फेऱया दररोज चालवित आहे.

आपली प्रतिक्रिया द्या