विज्ञान कथालेखक लक्ष्मण लोंढे यांचे स्मरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

विज्ञान कथालेखनात आपला ठसा उमटवणारे लक्ष्मण लोंढे यांचा तृतीय स्मृतिदिन कार्यक्रम ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.४५ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फादर फ्रान्सिस दिब्रिटो तर मुख्य अतिथी भानू काळे आहेत. यावेळी स्वाती लोंढे यांनी लिहिलेल्या ‘तू माझा सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन तर लक्ष्मण लोंढे यांच्या वेबसाईटचे अनावरण होणार आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञान एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या नवी मुंबई म्युझिक अँड ड्रामा सर्कल वाशी यांच्या ‘डोरा- एक केस स्टडी’ या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. लोंढे परिवार, व्हिजनचे श्रीनिवास नार्वेकर आणि राजहंस प्रकाशन यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.