
शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असा आरोप करणाऱ्या भाजपवर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपने युती केलेल्या सेक्युलर पक्षांची यादीच जाहीर केली.
दानवे यांनी ट्विट केले की, ‘युती तोडून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असा आरोप विरोधक सातत्याने आमच्यावर करतात. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पण हेच बोलले. मग ज्यांची नावं मी खाली देतोय, यांच्याशी युती करून भाजपने कोणतं हिंदुत्व साधलं होतं?
1. फारुख अब्दुल्ला (यांचा मुलगा वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होता), मेहबूबा मुफ्ती
2. अकाली दल
3. ओम प्रकाश चौटला
4. मायावती (भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री)
5. नितीश कुमार, ममता बॅनर्जी (भाजप सरकारमध्ये रेल्वे मंत्री राहिलेले)
6. नवीन पटनायक
7. चंद्राबाबू नायडू
8. देवेगौडा यांचा जनता दल
अजून साधारण 20 नावं आहेत माझ्याकडे!
2024 लोकसभेपुर्वी यांच्यापैकी कोणी गळाला लागतो का, याचे प्रयत्न सध्या भाजपकडून सुरूच आहेत. महाराष्ट्रात मात्र ही डाळ शिजणार नाही. सेक्युलर चेहरे असलेल्या लोकांशी हे देशभर युती करत फिरणार, पण यांचं हिंदुत्व शाबूत, अन आम्हीच सोडलं म्हणता. असं कसं चालेल?’ असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.



























































