
वीर फुलाजी देशपांडे (फुलाजी प्रभू देशपांडे) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक शूर सेनानी आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे थोरले बंधू होते. त्यांनी पन्हाळगडाच्या वेढय़ातून बाहेर पडताना आणि पावनखिंडीच्या (घोडखिंड) ऐतिहासिक लढाईत अभूतपूर्व पराम गाजवला. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाचा वेढा ओलांडून विशाळगडाकडे जात असताना, शत्रूला रोखण्यासाठी बाजीप्रभूंसोबत फुलाजींनीही घोडखिंडीत रक्षण केले. शत्रूच्या सैन्याला खिंडीत रोखून धरत त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि वीरगती प्राप्त केली. वीर फुलाजी देशपांडे यांची समाधी कोल्हापूर जिह्यातील ऐतिहासिक विशाळगडावर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीजवळच स्थित आहे. पावनखिंडीतील ऐतिहासिक लढय़ानंतर त्यांनी विशाळगडावर प्राण सोडले. पावनखिंड येथे त्यांचे स्मारक असून विशाळगडावर घडीव दगडी बांधकामातील समाधी आहे. मात्र समाधीपर्यंत जाण्याचा मार्ग पर्यटकांसाठी सोयीस्कर नाही. शिवप्रेमी व संस्थांच्या माध्यमातून या समाधी परिसराचा जीर्णोद्धार व जतन करण्यात आले आहे.





























































