EXCLUSIVE बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

3381

जयेश शहा । आंबेगाव

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून बिबट्याची दहशत सुरू आहे. तालुक्यात लाखनगाव या ठिकाणी बिबट्याने शेतकऱ्याच्या घरासमोरील पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. बिबट्याच्या या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

रविवारी पहाटे 3 च्या सुमारास बिबट्याने सतीश रोडे या शेतकऱ्याच्या घरासमोरील पाळीव कुत्र्यावरती हल्ला केला. बिबट्याच्या या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाली आहे. यामध्ये बिबट्या कशा प्रकारे दबा धरून घरासमोर बसलेल्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करत असल्याचे दिसते. यामध्ये सुदैवाने या कुत्र्याच्या गळ्यामध्ये चुकांचा पट्टा असल्याने यामध्ये त्याचा जीव वाचला आहे.

पाहा व्हिडीओ –

आपली प्रतिक्रिया द्या