मोळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार जण जखमी

908

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मोळा शिवारात शनिवार दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहे.

मेहकर पासून अंदाजे 11 कि मी अंतरावर असलेल्या मोळा येथील शिवारात शनिवारी दुपारी शेतकरी आपल्या शेतात काम करीत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. यामध्ये नितीन संजय धोटे (11), रमेश सखाराम वानखेडे (33), दत्तात्रय सखाराम वानखेडे (42) व मधुकर नामदेव वानखेडे (57) हे चार जण जखमी झाले आहेत. गावकऱ्यांनी आरडाओरडा करून बिबट्याला पळवून लावले आहे. घटनास्थळी वनविभागाने पिंजरा लावला असून सर्व विभागाचे अधिकारी मोळा पोहोचले असल्याचे वन अधिकारी संदीप गवारे यांनी सांगितले. या घटनेबाबत तहसीलदार संजय गरकळ यांनी सुध्दा दूजोरा दिला आहे.जखमींचा आकडा सात असल्याचे गावकरी  बोलत आहे. चार जखमींवर मेहकर ग्रामीण रूग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी ते खासगी रूग्णालयात गेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या