कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारेमध्ये बिबट्याचा बोकडावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ऐडंकी परिसरात बिबट्याचा वावर गेल्या महिन्यापासून असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवत बोकड मारून बाळासाहेब खरे व संगीता खरे यांच्या समोरून उसाच्या शेतात फरफटत नेला. रात्री बिबट्याच्या दर्शनाने खरे कुटुंब भयभीत झाले होते. ही घटना सकाळी त्यांनी शेजारच्यांना सांगितली.

तालुक्यातील चांदेकसारे ऐडंकी परिसरात बिबट्याचा वावर गेल्या महिन्यापासून असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांच्या शेळ्या मेंढ्या कोंबड्या व पाळीव कुत्री या बिबट्याचे शिकार करून फस्त केली आहेत.या परिसरात मसोबा वस्ती शाळा असल्याने पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी भीती वाटत आहे. परिसरातील नागरिकांनी या बिबट्याने अनेकवेळा पाळीव प्राण्यांची शिकार केल्याचे सांगितले. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला असून वन विभागाने त्वरित या परिसरात पिंजरा लावावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.