काय सांगता… शिरूरमध्ये रस्त्यावर आला बिबट्याचा बछडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
leopard shirur

बिबट्याचा बछडा दिसून आल्यामुळे शिरूरमध्ये खळबळ उडाली आहे. शिरूर तालुक्यातील आंधळगाव येथील ऊर्जा दूध डेअरी जवळ असणाऱ्या रस्त्यावर रस्ता ओलांडताना एक नुकतेच जन्मलेला बिबट्याचा बछडा नागरिकांना आढळून आला आहे.

स्थानिक रहिवाशी या रस्त्याने जात असताना हा बछडा रस्त्यापलीकडे असणाऱ्या उसामध्ये जाण्यासाठी रस्ता ओलांडत होता.

बिबट्याचा बछडा दिसताच नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यामुळे थोड्याच वेळात वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी येतील आणि या बिबट्याच्या नवजात पिल्लाला घेऊन जातील अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

सध्या कडाक्याची थंडी असल्यामुळे बिबट्या ल्गारठून गेले होता. त्यामुळे त्याला अशक्तपणा जाणवत होते. स्थानिक रहिवाशांनी त्याला मिळण्यासाठी प्रयत्न केले तसेच त्याला दुध देखील पाजले. सद्यस्थितीत हे पिल्लू चांगल्या परिस्थितीत असून वनविभागाचे अधिकारी आल्यानंतर त्यांच्याकडे पिल्ल्याला सोपवण्यात येईल असे नागरिकांनी सांगितले.