वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

१५ डिसेंबर रोजी वनपरिक्षेत्र देवलापार येथील संरक्षित वनकक्ष क्रमांक ४९४ मधून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर देवलापारनजीक अनोळखी वाहनाच्या धडकेने बिबट्या (मादी) जखमी झाला. बिबट्यावर पंधरा दिवसांपासून वन्यप्राणी बचाव केंद्र गोरेवाडा, नागपूर येथे उपचार सुरू होते. मात्र रविवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गोरेवाडा येथील वन्यप्राणी बचाव केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर तेथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे, सेमिनरी हिल्स वनपरिक्षेत्र अधिकारी गंगावणे, वन्यप्राणी बचाव केंद्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी भिवगडे, डॉ. सोनकुसरे, डॉ. सुजीत मॅथ्यू, डॉ. पावशे आणि डॉ. शालिनी उपस्थित होते.