वेकोलीच्या खड्ड्यात पडून बिबट्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर शहराजवळील दुर्गापूर येथे वेकोलीच्या कोळसा खाणीतील सेक्टर दोन मध्ये असलेल्या खड्ड्यातील पाण्यामध्ये पळून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे.

मागील काही दिवसांपासून कोळसा खाणीच्या परिसरामध्ये बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे उघडकीस आले होते. यातच दुर्गापूर वेकोलीच्या कोळसा खाणीतील सेक्टर 2 मध्ये असलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. हे पाणी बाहेर काढण्यासाठी येथे मोटारपंप लावण्यात आले होते. आज पहाटेच्या सुमारास अंधार असताना आलेल्या बिबट्याचा या खड्ड्यात पडून मृत्यू झाला. ही घटना लक्षात येताच वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली. वन अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृत बिबट्याला बाहेर काढले.