कोपरगाव घारी डाऊच येथे बिबट्याचा वावर; शेतकऱ्यांमध्ये दहशत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
leopard

कोपरगाव तालुक्यातील जुन्या मुंबई-नागपूर महामार्गावरील घारी येथील उमरी नदीकाठी दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतात काम करण्यासाठी गेलेल्या किशोर पवार या शेतकऱ्याला बिबट्या दिसला. त्यांनी ही बाब इतर शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

डाऊच बुद्रुक व घारी गावामधून उमरी नदी वाहते. या उमरी नदीच्या काठी दाट झाडी असल्याने बिबट्याला लपायला जागा मिळाली आहे. बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतामध्ये कसे जायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.