आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाला बिबटय़ाने पळविले

मेंढपाळ महिलेच्या कुशीत झोपलेल्या 11 महिन्यांच्या बाळाला बिबटय़ाने पळवल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री दौंड तालुक्यातील दहिटणे येथे घडली. पुण्यातील रेस्क्यू टीम, दौंड वनविभागाचे पथक आणि यवत पोलीस यांनी आज सकाळपासून शोधमोहीम राबवूनही सायंकाळपर्यंत बाळाचा शोध लागला नसल्याची माहिती दौंडचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली.