शिकारीच्या फाशात अडकून बिबट्या जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

मूल तालुक्यातील चीचपल्ली वन परिक्षेत्रातील खालवसपेठ येथील गावाशेजारी  शिकारी ताराच्या फाशात बिबट्या अडकला, वन्यजीव शिकारीसाठी ताराचा फासा लावला होता, गावाजवळ बिबट बघण्यासाठी गेलेला सुरेश शेडमाके ग्रामस्थ किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारा साठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वनविभागाच्या पथकाची बिबट्याच्या मुक्तीसाठी शर्थीचे प्रयत्न केले. बिबट्याला तारेच्या फाशातून काढून चंद्रपुरातील ट्रीटमेंट सेंटर येथे आणण्यात आले आहे. बिबट्या या फाशात अडकून जखमी झाला आहे, त्याच्यावर उपचार सुरु आहेत.