शिक्षणासाठी एकत्र राहत होत्या बहिणी, एकमेकींशी लग्न करून थाटला संसार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यात दोन चुलत बहिणींनी एकमेकींशी लग्न केले आहे. या दोघी बहिणी गेल्या काही वर्षांपासून शिक्षणासाठी झुमरी तलैया येथे एकत्र राहत होत्या. त्यांच्या लग्नाने त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

चुलत बहिणी असलेल्या या दोघी पैकी एकीचे वय 24 वर्ष आहे तर दुसरीचे वय 20 आहे. या दोघी गेल्या पाच वर्षांपासून एकमेकींवर प्रेम करायच्या. कुटुंबात आपले प्रेम मान्य होणार नाही. म्हणून या दोघींनी शिक्षणाचा बहाणा करत दुसऱ्या गावात एकत्र राहू लाल्या. एकत्र राहत असताना या दोघींनी न्यूयॉर्कमधील अंजली चक्रवर्ती व सूफी संडल्स यांच्या लग्नाबद्दल ऐकले. त्यांनी ज्या प्रकारे संसार थाटला. तसा आपणही थाटावा अशी दोघींचीही इच्छा होती. अखेर त्या दोघींनी गेल्या महिन्यात झुमरी तलैयामधील शिव मंदिरात लग्न केले. त्यांच्या लग्नाने त्या दोघींच्याही कुटुंबाला धक्का बसला असून ते सध्या दोघींशीही बोलत नाहीत.