त्या मुलीची जात कोणती? तो कोणत्या समाजाचा? समाजमाध्यमांनी नासवलं समाजमन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न हल्लेखोराने केला. हल्लेखोर हातात कोयता घेऊन तरुणीच्या मागे धावत होता तेव्हा अनेकजण बघ्याची भूमिका घेत होते. मात्र, यावेळी लेशपाल जवळगे या जिगरबाज तरुणाने हल्लेखोराला पकडले. लेशपालमुळेच त्या तरुणीचे प्राण वाचले. या घटनेचा व्हिडिओ पाहून महाराष्ट्र सुन्न झाला. मात्र, सोशल मिडियाने (समाजमाध्यम) समाज मन किती नासवले याचा प्रत्येय पुन्हा आला आहे. त्या मुलीची जात कोणती? तो हल्लेखोर कोणत्या जातीचा? अशी चर्चा समाज माध्यमांवर सुरू आहे.

मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास सदाशिव पेठेत टिळक रस्ता ते पेरूगेट पोलीस चौकीदरम्यान हे भयंकर थरार नाटय़ झाले. हल्लेखोर शांतनू लक्ष्मण जाधवने एकतर्फी प्रेमातून 20 वर्षीय तरुणीवर हल्ला केला. वाचवा, वाचवा असे जीवाच्या अकांताने ओरडत तरुणी पळत होती. कोणीही मदतीला येत नव्हते. तेव्हा एमपीएससीची तयारी करणारा लेशपाल जवळगे हा अभ्यासिकेकडे जात होता. लेशपालने जिवाची पर्वा न करता हल्लेखोराचे दोन्ही हात पकडले. कोयता हिसकावून घेतला. लेशपालमुळेच तरुणीचे प्राण वाचले. या धाडसाबद्दल लेशपालचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला सत्कारासाठी बोलावले जात आहे. मात्र, लेशपाल जवळगेच्या इन्स्टाग्राम स्टोरीने सर्वांचे लक्ष वेधले असून त्याची चर्चा सुरू आहे.

लेशपालने काय म्हटले…
लेशपालने तरुणीचे प्राण वाचवल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत असतानाच काहीजणांनी चक्क लेशपालकडेच त्या मुलीची जात कोणती? तो मुलगा कोणत्या जातीचा? अशी विचारणा केली आहे. काहीजणांनी सोशल मीडियावर तरुणी आणि हल्लेखोर तरुणाची जात शोधण्याचा प्रयत्न केला.

खोलीवर एक-दीड तास खूप रडलो
लेशपालने मंगळवारी सकाळी अभ्यासिकेकडे जाताना काय घडले, त्या तरुणीचे प्राण कसे वाचवले. यावेळी हर्षद पाटील या तरुणानेही मदत केली याबाबतचा घटनाक्रम सांगितला. ‘मला काय झाले माहित नाही. मी पळत सुटलो. काय होईल ते होईल; पण ती मुलगी वाचली पाहिजे एवढाच विचार मी केला. त्या घटनेनंतर मी खोलीवर आलो आणि एक-दीड तास खूप रडलो. कारण 3 सेपंद मला वेळ झाला असता तर ती मुलगी वाचली नसती. तिचा खून कसा झाला? हे मला सर्वांना सांगावे लागले असत़े असे झाले असते तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो’, असे लेशपालने सांगितले.

लेशपालने इन्स्टा स्टोरीतून संताप व्यक्त केला. ‘त्या मुलीची आणि मुलाची ‘जात’ कुठली होती असं मला DM करून विचारणाऱया सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे की, ते मेसेज डिलिट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता, नाही समाजाचे. कीड लागली आहे तुमच्या वरच्या थोडय़ाफार असलेल्या भागाला.’ असे त्याने नमूद केले.