
निवडणुका नेहमीच येतात आणि जातात. कधीही न दिसणारे निवडणुका आल्या की दिसतात. पण शिवसेना हा असा एकमेव पक्ष आहे, जो निवडणुका असो अथवा नसो नेहमीच काम करतो. त्यामुळेच येथील विकासकामांची देशात आणि जगभरात चर्चा होते. नेहमीच आघाडीवर असलेल्या मुंबईला आणखी चांगली करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र काम करूया असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
चुनाभट्टी येथे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या निधीतून उभारलेल्या मराठा भवनाचे आणि शिवसेना शाखा क्र. 170 चे उद्घाटन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईच्या विकासासाठी शिवसेना सातत्याने काम करत आहे. येथील आरोग्याच्या सुविधा वाढवण्यासाठी, शौक्षिणक दर्जा सुधारण्यासाठी, वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरू असून त्याचा नागरिकांना लाभ होत आहे. आरोग्य सेवेचा तर मुंबई, महाराष्ट्राबरोबरच देशभरातील अनेक लोक लाभ घेतात हीच शिवसेनेच्या विकासकामांची पोचपावती असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. बेस्ट ही खऱया आर्थाने बेस्ट आहे. अवघ्या पाच रुपयांत बेस्टचा प्रवास करता येत असून ही जगातील एकमेव स्वस्त सेवा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आज उद्घाटन झालेल्या मराठा भवनचा आणि शाखेचा येथील नागरिकांना चांगला लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेना नेहमीच चांगली विकासकामे करत असल्याने येथील नागरिक खंबीरपणे पाठीशी उभा राहतात. हीच शिवसेनची ताकद असल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी सांगितले. यावेळी शिवसेना सचिक सूरज चव्हाण, विभागप्रमुख, आमदार संजय पोतनीस, महिला संघटक संजना मुणगेकर, नगरसेविका सानव तांडेल, किधानसभा संघटक दिलीप शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी ओमकार आर्ट प्रस्तूत विश्वास चव्हाण यांचा महाराष्ट्र गाथा हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
…आता पालिकेच्या पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश मिळावा म्हणून फोन येतात
प्रत्येकजण आपल्या मुलाला खासगी शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पत्र देण्याची, फोन करण्याची विनंती करतात. त्याचप्रमाणे पालिकेच्या शाळेत प्रकेश मिळावा म्हणून फोन यावा अशी माझी इच्छा होती. त्यासाठी आपण पालिका शाळांचा दर्जा उंचाकला आहे. अनेक ठिकाणी पब्लिक स्कूल सुरू केली आहेत. त्यामध्ये प्रकेश मिळाका म्हणून आता मला फोन येता ही समाधानची बाब असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले
.
असे आहे मराठा भवन
- सहाशे चौरस फुटांची सुसज्ज इमारत
अत्याधुनिक सुविधांसह वातानूकूलित यंत्रणा
छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा
दीडशे-दोनशे नागरिक बसतील एकढी क्षमता
सहा महिन्यात भवन उभारणीचे काम पूर्ण






























































