कायनेटिक चौकतील पाणी प्रश्‍नी आत्मदहनाचा इशारा

432

नगरमधील कायनेटिक चौक परिसरातील विविध भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते सोपान कारखिले यांनी मनपा उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांना निवेदन देऊन पाणी पुरवठा सुरळीत झाले नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी रावजी नांगरे, शुभम बेद्रे आदींसह नागरिक उपस्थित होते.

मनपा आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कायनेटिक चौक परिसरातील प्रियंका कॉलनी, लक्ष्मीकृपा कॉलनी, सुखकर्ता कॉलनी, छायानगर,गुणे बंगला परिसर, रविश कॉलनी, सारस कॉलनी, आव्हाड वीटभट्टी, आंबेडकर उद्यान ते सानप मळा, नगर-दौंड रोड ते सुभद्रानगरपर्यंत, उदावंत मळा,पांजरापोळ या भागामध्ये पाण्याची समस्या बिकट आहे. गेली 10 ते 15 वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. कधी पाणी येते तर कधी पाणी येत नाही.पाणी सोडले तर नळाला पाणी येत नाही. तेथील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागते. पाणीपुरवठ्याची कोणतीही वेळ नाही. पाणी कधीही सोडण्यात येते. तसेच येणारे पाणी पूर्ण दाबाने येत नाही. या भागामध्ये फेज टू चे काम अर्धवट झाले आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे व आपण स्वत: यामध्ये लक्ष घालावे. रेल्वे स्टेशनच्या जो पाण्याचा टाईम आहे, त्याच भागाचा वॉल चालू पाहिजे, पण संभाजीनगर हायवे ते कोठी ते महानगरपालिका ते मुकुंदनगर या भागामधील वालमन तेथील वॉल चालू ठेवतात, याची आपण चौकशी करावी व त्याच्यावर लक्ष ठेवावे. यासर्व बाबींचा विचार करुन जनतेला पाणी व्यवस्थीत देण्यात यावे, जर असे नाही झाले तर मी स्वत: या आपल्या महानगरपालिकेसमोर आत्मदहन करणार आहे, याची सर्व जबाबदारी महानगरपालिकेची राहील व पूर्ण प्रशासनाची राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या