एलआयसीच्या आयपीओचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही, इरडाचे स्पष्टीकरण

178

जीवन विमा निगम (एलआयसी) आयपीओ काढणार आहेत असे म्हटले जात असले तरी त्यांच्याकडून त्याबाबतचा कोणताही प्रस्ताव अद्याप आपल्याला मिळालेला नाही, असे इन्शुरन्स क्षेत्रावर नजर ठेवणाऱया विमा नियामक विकास प्राधिकरणाने (इरडा) मंगळवारी स्पष्ट केले.

एलआयसीने सार्वजनिक बाजारात उतरायचे असेल तर कंपनीने आधी शेअर बाजारात लिस्टिंग होण्याची गरज आहे, असे ‘इरडा’चे संचालक एस. सी. खुंटीया यांनी सांगितले. कोणतीही कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध झाली तर त्या कंपनीची विश्वासार्हता वाढते आणि त्या आधारावर कंपनीला फायदाही होतो. एलआयसीनेही आधी शेअर बाजारात सूचिबद्ध व्हायला हवे, असे खुंटीया यांनी एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

करामध्ये सूट मिळणार

यंदाच्या अर्थसंकल्पातही एलआयसीच्या आयपीओची घोषणा करण्यात आली आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास करदात्यांना करामध्ये काही प्रमाणात सूट देण्याचेही सरकारने ठरवले आहे, मात्र त्याबाबतचा प्रस्ताव एलआयसीकडून अजून तरी आपल्याला आलेला नाही असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या