
कुत्रा चावल्याची बातमी बऱ्याचदा कानावर येते. लहान मुलांना कुत्र्याचा धाक दाखवून तो चावला की, 14 इंजेक्शन पोटात घेण्याची भीती आजही दाखवली जाते. कुत्र्यांचे तीक्ष्ण आणि मोठे दात पाहिले की, ते चावण्याची भीती वाटणे साहजिकच आहे. यासाठी कुत्र्याने चावा घेतल्यास कोणते प्रथमोपचार करावेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कुत्रा चावलेल्या व्यक्तिला तात्काळ योग्य वेळी प्राथमिक उपचार दिल्यास रेबिजचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
एखाद्या व्यक्तिला कुत्रा चावला तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी कोणते प्राथमिक उपचार करावेत, याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. समजा एखादा कुत्रा आक्रमक झाला आणि तो तुमच्या ओळखीच्या लोकांना किंवा साथीदारांना चावला, तर डॉक्टरांपर्यंत पोहोचण्यापूर्वी काही प्राथमिक उपचार करावे लागतात. अशा वेळी त्या व्यक्तिला कोणती मदत करता येईल, ते पाहुया.
कुत्रा चावल्यानंतर रेबीज होण्याचा सर्वाधिक धोका असतो. म्हणूनच डॉक्टर कुत्रा चावल्यानंतर लवकरात लवकर उपचार करण्याची शिफारस करतात. त्यासोबतच त्यापूर्वी काही प्राथमिक उपचारही आवश्यक आहेत. कुत्रा चावलेल्या व्यक्तीला योग्य वेळी प्राथमिक उपचार दिल्यास रेबीजचा धोका ऐंशी टक्क्यांपर्यंत कमी होतो.
प्राथमिक उपचार काय कराल?
– कुत्र्याने चावा घेतलेली जागा पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर चाव्याच्या जागी सौम्य साबण लावा. ही जागा किमान दहा मिनिटे धुवा. यामुळे विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी मदत होईल.
– त्यानंतर चावलेली जागा धुतल्यानंतर स्वच्छ कॉटनच्या कापडाने व्यवस्थित कोरडी करून घ्या. जखम पुसल्यानंतर कोरड्या जखमेवर अँण्टिसेप्टिक क्रीम लावा.
– जर अँटीसेप्टिक क्रीम उपलब्ध नसेल तर अल्कोहोल किंवा आयोडीन द्रावणाने जखम स्वच्छ पुसू शकता.
लस घ्या
प्राथमिक उपचार केल्यानंतर जराही वेळ वाया न घालवता तात्काळ रुग्णालयात जाऊन अँटी रेबीज इंजेक्शन घ्या. याशिवाय इम्युनोग्लोब्युलिनचे इंजेक्शन कुत्रा चावलेल्या व्यक्तिला दिले जाते, मात्र हा निर्णय डॉक्टर घेतात.
लस घेतल्यानंतर
लस घेतल्यानंतर सर्वप्रथम कुत्रा चावल्याची जखम मोठी आहे की छोटी हे तपासा. चाव्याची खूण लहान असल्यास इंजेक्शननंतर शांत बसू नका. प्रथम बाइटचे चिन्ह मोठे आहे की लहान ते तपासा. चाव्याचे चिन्ह लहान असल्यास, जखम उघडीच ठेवा जेणेकरून ती लवकर बरी होईल. जखमेच्या भागाचे सतत निरीक्षण करत रहा. कोणत्याही प्रकारचा संसर्ग, लालसरपणा, सूज, वेदना किंवा ताप येत असल्यास विलंब न करता डॉक्टरांना याबाबत माहिती द्या शिवाय कोणत्याही प्रकारचे औषध किंवा उपचार घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.





























































