
लसूण ही आरोग्यासाठी गुणकारी मानली जाते. गरमीच्या दिवसांमध्ये लसूण कच्चे खाल्ले तर अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होईल. लसणाचे आरोग्यासाठी जबरदस्त फायदे आहेत.
बद्धकोष्ठतेसाठी रामबाण उपाय
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी कच्चे लसूण खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात बद्धकोष्ठतेचा त्रास अनेकांना होतो. अशा परिस्थितीत कच्चे लसूण खावे. कच्चे लसूण नियमितपणे खाल्ल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
रक्तदाब नियंत्रण राहण्यास मदत
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी लसूण उपयुक्त आहे. विशेष करुन मधुमेही रुग्णांनी लसूण खाणे गरजेचे आहे. त्याने मधुमेही रुग्णांची रक्तातील साखर नियंत्रणात राहिल. यामध्ये असलेले अॅण्टी डायबिटीस गुण मधुमेही रूग्णासाठी प्रभावी आहेत.
हृदयासाठी देखील लसूण फायदेशीर
कच्चे लसूण हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यात दररोज 1 ते 2 कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्या तर नक्कीच त्याचा फायदा होतो. तसेच कोलेस्ट्रॉल पातळीही नियंत्रणात राहते, ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
व्हायरल – बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी गुणकारी
एवढेच नाही तर व्हायरल आणि बॅक्टेरियाचे संक्रमण रोखण्यासाठीही लसणाची मदत होते. यामध्ये असलेले अँटीव्हायरल, अँटी-फंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण करतात.






























































