Arthritis Home Remedies – ओव्याचा वापर करा, सांधेदुखीपासून आराम मिळवा

सांधेदुखी ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे, जी केवळ वृद्धांनाच नाही तर तरुणांनाही त्रास देते. खरंतर आपली सध्याची आधुनिक जीवनशैली, खाण्याच्या वाईट सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढत्या वजनामुळे सांधेदुखी होऊ शकते. सांधेदुखीची समस्या अनेकदा गुडघे, कोपर आणि खांद्यामध्ये दिसून येते. ही वेदना कधीकधी सौम्य असते, विश्रांतीने मात्र ही वेदना बरी होते. परंतु कधीकधी ती असह्य होऊ शकते. यामुळे आपल्या दैनंदिन कामावर फार मोठा परीणाम होतो. सांधेदुखीची समस्या सोडवण्यासाठी, आयुर्वेदात अनेक नैसर्गिक उपाय सुचवण्यात आले आहेत. यापैकी एक उत्तम उपाय म्हणजे ओव्याचा वापर हा खूपच प्रभावी मानला जातो.

सांधेदुखी होत असल्यास, ओवा हा खूप प्रभावी ठरतो. ओवा हा हाडांमधील दुखणे तसेच स्नायूदुखी यावर परीणामकारक आहे. ओव्यामुळे गुडघेदुखी तसेच हाडांच्या वेदना कमी होतात. आयुर्वेदात ओवा हा वातविरोधी म्हणून ओळखला जातो. ओवा हा वात आणि कफ शांत करतो.

आयुर्वेदात ओवा आणि मोहरीच्या तेलाने मालिश करणे ही फार पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. ही पद्धत फारच प्रभावी मानली जाते. यामुळे सांधेदुखीपासुन खूप आराम मिळतो असे तज्ज्ञांचे मत आहे. ओवा आणि मोहरीच्या तेलाच्या मालिशमुळे शरीराच्या प्रभावित भागात उष्णता निर्माण होते आणि वेदना कमी होतात.

मोहरीचे तेल गरम करा आणि त्यात एक चमचा ओवा घालावा.
हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या, नंतर वेदनादायक भागांवर मालिश करा.
मसाज केल्यानंतर, ते 20-30 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

फायदे
ओवा आणि मोहरीचे तेल त्वचेद्वारे शोषले जाते आणि सांध्यामध्ये खोलवर पोहोचते आणि वेदनांपासून आराम देते.
हे स्नायूंना आराम देते, ज्यामुळे वेदनांची समस्या कमी होऊ शकते.

ओव्याची पेस्ट

ओव्याची पेस्ट बाहेरून लावल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. ही पेस्ट सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते.

ओव्याची पावडर बनवावी, यामध्ये थोडे पाणी घालून जाडसर पेस्ट करावी. ही पेस्ट प्रभावित भागांवर लावावी आणि 15-20 मिनिटे सुकू द्यावे.
त्यानंतर कोमट पाण्याने धुवावे.

फायदे
ओव्याची पेस्ट थेट त्वचेवर लावल्याने सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. सांधे दुखत आहेत किंवा सुजले आहेत त्यांच्यासाठी हा उपाय विशेषतः उपयुक्त आहे. याच्या नियमित वापराने सांधेदुखीशी संबंधित समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात.

 

पावसाळ्यात चिमूटभर ओवा खाण्याचे काय होतील फायदे? वाचा

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)